खरंच दुकानातून आणलेल्या बदामाचे तेल आधीच काढलेले असते का ?? Agro2home.com

Kolhapur, Maharashtra, India Published date: August 30, 2021

तुम्ही बाजारात बदाम खरेदी करायला जाता, तेव्हा बऱ्याचदा तुम्ही अनेक प्रकारचे बदाम पाहिला असाल. प्रकारांप्रमाणेच त्यांची किंमत देखील वेगवेगळी असते. तसे पाहाता आपल्याला सर्व बदाम दिसायला एक सारखेच दिसतात. पण मग त्यांची किंमत का वेगळी असा आपल्या प्रश्न पडतो. त्याचबरोबर लोकांना एक महत्वाचा प्रश्न देखील पडतो की, मग यांपैकी कोणते बदाम घ्यावेत? नक्की कोणते बदाम चांगले आहेत? आपल्यापैकी बहुतेक जण किंमतीच्या आधारावर हा निर्णय घेतो.


त्याच बरोबर लोकांमध्ये एक समज देखील आहे की, तेल काढलेले बदाम स्वस्त असतात. म्हणजेच बाजारात जे आपल्याला स्वस्तात बदाम मिळतात त्यांच्यातील तेल काढलेले असते. त्यामुळे बरेच लोक घरी बदाम आणतात आणि त्यांना फोडतात आणि बदाम चांगले आहेत की, नाही हे तेलाच्या आधारावर तपासतात.

तसे, बहुतेक लोक तक्रार करतात की, दुकानदार किंवा कारखान्यात त्याचे तेल काढून घेतात. पण, तुम्हाला यामागचे खरे कारण काय आहे हे माहित आहे का? तुम्हाला जसं वाटतयं तसं काहीही नसतं. तेल काढण्यामागील सत्य काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खरंच बदामांमधून तेल काढता येते का?
लोकांना असे वाटते की, बदामातून तेल काढले जाते, पण तसे काही नाही. तज्ञांचा असा विश्वास आहे की, बदामांमधून तेल काढणे ही सोपी प्रक्रिया नाही, यामुळे बदामांमधून तेल काढले जात नाही. तसेच, त्यातून कोणत्याही सिरिंजद्वारे देखीलतेल काढले जात नाही कारण ते शक्य नाही.

मग बदाम कोरडे का होतात?
खरेतर बदाम अनेक दिवस ठेवले तर ते स्वतः सुकतात. जेव्हा बदामांची कापणी केली जाते, तेव्हा ते ओले राहतात आणि तेलाचे प्रमाण जास्त असते आणि नंतर ते सुकतात. ज्यामुळे त्यातील तेल कमी होतं, ज्यामुळे लोकांना असे वाटते की, त्यांच्यातून तेल काढण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, हे प्रत्येक बदामाच्या प्रकारावर देखील अवलंबून असते.

उदाहरणार्थ, बदाम भारतात वेगवेगळ्या ठिकाणाहून आयात केले जातात. ज्यात अफगाणिस्तान पहिला आहे, जिथून गुरवंती गिरीचे बदाम येतात, जे गुणवत्तेत चांगले आहेत आणि त्यातील तेलाच्या जास्त प्रमाणामुळे ते खूप महाग विकले जातात.

याशिवाय, ममरा कर्नल हे बदाम इराणमधून येतात, जे थोडे स्वस्त आणि लवकरच कोरडे होतात. याशिवाय, कॅलिफोर्निया बदाम देखील येतात.

अशा परिस्थितीत, बदामांच्या प्रकारामुळे त्यांचे दर निश्चित केला जातो. तसेच दिवाळीनंतर हिवाळ्यात बदामाचे नवीन उत्पादन होते आणि यावेळी बदाम खूप चांगले असतात, त्यामुळे ते यावेळी ते खूप महाग असतात आणि नंतर बदाम सुकल्यानंतर त्यांचे दर खाली येतात.

  Contact publisher  खरंच दुकानातून आणलेल्या बदामाचे तेल आधीच काढलेले असते का ??

  Kolhapur, Maharashtra, India

  Agro2home

  Published date: August 30, 2021

  Views: 366

  2021 All rights reserved Agro2home.com
  Contact Chat