History of Sunflower

Mumbai, Mumbai, Maharashtra, India Published date: January 4, 2019 Modified date: January 4, 2019

तुम्हाला माहित आहे का ?

सूर्यफूल हे मूळ उत्तर अमेरिकेतील पीक आहे. रेड इंडियन लोकांच्या काही टोळ्यानी इसवी सन पूर्व १००० वर्षा पूर्वी जंगलात येणाऱ्या सूर्यफुलांची लागवड करायला सुरुवात केली होती. नंतर हे पीक स्पेन मार्गे पूर्ण युरोप भर पसरले. आणि नंतर साधारण इसवी बाराशे नंतर ते पीक पोर्तुगीजानी भारतात आणले.
आज
सूर्यफूल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तेलबिया पीक असून भारतात एकूण तेलबियांच्या क्षेत्रापैकी २८ % क्षेत्र सूर्यफुलासाठी व एकूण खाद्यतेलांपैकी १० % उत्पादन सूर्यफुलाच्या तेलाचे आहे. महाराष्ट्रात विविध तेलबिया पिकांची लागवडीसह मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती व इतर काही जिल्ह्यांत प्रामुख्याने सूर्यफुलाची लागवड केली जाते. राज्याच्या एकूण सूर्यफूल क्षेत्रापैकी ७० % क्षेत्र मराठवाड्यात आहे. सूर्यफूल हे गळिताचे त्यामानाने नवीन पीक असून महाराष्ट्र राज्यात सन २००२ - २००३ वर्षी एकूण २.८९ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली होते. बियांचे उत्पन्न १.४३ लाख टन होते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४९४ किलो आहे.

  Contact publisher  History of Sunflower

  Mumbai, Mumbai, Maharashtra, India

  Team Agro2home

  Published date: January 4, 2019

  Modified date: January 4, 2019

  Views: 279

  2018 All rights reserved Agro2home.com
  Contact Chat